Skip to main content

Posts

Showing posts from April, 2020

सकलकलाशास्त्राचा निशांः राजा शरफोजी

भोसले घराण्यांनी हिंदुस्तानच्या इतिहासात केलेली कामगिरी अतुल्य आहे.  पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे, दुसरे म्हणजे शिवाजी महाराजांचे  बंधू व्यंकोजीराजे भोसले यांचे, ज्यांचे राज्य तंजावरास होते. तिसरे म्हणजे  नागपूरचे भोसले घराणे. या घराण्यांनी भारताच्या इतिहासाला कलाटणी दिली.  स्वराज्याची स्थापना करून शिवाजी महाराजांनी हिंदुस्थानच नव्हे तर  व्हिएतनाम सारख्या देशांनाही पारतंत्र्याशी लढण्याची ऊर्जा दिली. नागपूरकर  भोसले यांनी मध्य प्रदेश, गोंडवण, उडीसा या मुलखात मराठ्यांची सत्ता बळकट  करून महाराष्ट्र धर्म वाढवावा ऐसे केले. पूर्वीच्या गोंडवानात मराठी  संस्कृतीची पकड पक्की करून नागपूर, वर्धा आणि भंडारा अशी वीस हजार चौरस  मैलांची कायमची भर घातली. मात्र दक्षिण भारताच्या दूरदेशीच्या  कर्नाटक-तामिळनाडूच्या अज्ञात मुलुखात महान पिते महाराजा शहाजीराजे नंतर  व्यंकोजी राजे यांच्या वंशजांकडे महाराष्ट्रातील मराठी माणसाने कधी लक्षच  दिले नाही. दक्षिणेतील जनसागरात बेमालूमपणे मिसळून सेवा करणारे हे घराणे  मराठी माणसाला बेमालूम असेच राहिले. दक्षिणेस तंजावरास मराठी सिंहासन स्थापून अधिष्ठित होणा