छत्रपती घराण्याचे व समर्थ रामदास स्वामींचे जुने संबंध आहेत परंतु आजही ते भावबंध कसे टिकून आहेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपतींच्या तंजावर घराण्याचे सध्याचे वंशज युवराज प्रतापसिंहराजे भोसले! (रूढ नाव-राणाप्रताप)
पंचविशीतला हा तरुण युवराज इतका साधा रहातो की मोटरसायकलवरून तंजावरात फ़िरणा-या या युवराजाकडे अखंड दक्षिण हिंदुस्थानावर राज्य करणा-या एका महापराक्रमी घराण्याचे वारसपण आहे हे कुणालाही न कळावे!
यांचा सर्वोत्तम गुण म्हणजे समर्थ रामदास स्वामींच्या चरणी असलेली असीम निष्ठा!
तंजावरच्या शरभोजीराजे भोसले संग्रहालयाचे व आशियातील सर्वात समृद्ध ग्रंथालय असलेल्या सरस्वती महाल ग्रंथालयाचे पालकत्व स्वीकारून यांनी त्यांचे पुनरुत्थान सध्या आरंभिले आहे...
अत्यंत नम्र स्वभावाच्या या युवराजांचे आपल्या सर्व उपक्रमात अत्यंत मोलाचे पाठबळ असते! यांना छायाचित्रणाचाही छंद आहे.
गतवर्षी तमिळनाडूतल्या एका संस्थेने आयोजित केलेल्या एका फ़ेसबुक छायाचित्र स्पर्धेत यांच्या एका अतिदुर्मिळ तंजावरी हस्तलिखिताच्या चित्रास सर्वाधिक लाईक्स मिळूनही केवळ द्रविड-आर्य वादाला चटावलेल्या घातकी वृत्तीमुळे यांना उपविजेतेपद दिले गेले.
यंदा तसे होऊ नये असे महाराष्ट्रास वाटत असेल तर त्यांच्या खालील ३ छायाचित्रांना इतक्या भरभरून लाईक्स द्या कि अवघ्या राष्ट्रघातकी शक्तींना महाराष्ट्राचे व महाराष्ट्राच्या छत्रपती घराण्याप्रती असलेल्या आदराचे प्रलयंकर दर्शन घडावे!
https://www.facebook.com/
https://www.facebook.com/
https://www.facebook.com/
Dasbodh.com
Comments
Post a Comment