तंजावरच्या मराठ्यांच्या राजवटीचा इतिहास आता पुस्तकरूपाने मराठीमध्ये उपलब्ध होणार आहे. राज्य मराठी संस्थेने तंजावरमधील सुमारे पाच लाख मोडी हस्तलिखितांच्या मराठीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, या वर्षाच्या अखेरीपर्यंत तो पूर्णत्वाला जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्रभाऊ व्यंकोजीराजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी तमिळनाडूमध्ये सुमारे १८० वर्षे राज्य केले. मात्र, या इतिहासाविषयी फारशी माहिती मराठीत उपलब्ध नाही. तंजावरच्या तामिळ विद्यापीठात ही माहिती मोडी हस्तलिखितांमध्ये उपलब्ध आहे. त्यात भूर्जपत्रे, महाराजांचा पत्रव्यवहार, खलिते आदींचा समावेश आहे. ही हस्तलिखिते मराठीत आणण्यासाठी राज्य सरकारच्या राज्य मराठी विकास संस्थेने तामिळ विद्यापीठासह २०१३मध्ये करार केला असून, या माध्यमातून सुमारे पाच लाख अतिमहत्त्वाच्या मोडी कागदपत्रांचे मराठीकरण करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या सरस्वतीमहल ग्रंथालयाचे मोडी विभागप्रमुख डॉ. विवेकानंद गोपाळ यांच्या सहकार्याने या ऐतिहासिक कागदपत्रांतून इतिहास, समाजजीवन, संस्कृतीवर प्रकाश पडणार आहे.
डिजिटायझेशन होणार
राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. अशोक सोलनकर यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली. 'या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत आले आहे. या जीर्ण झालेल्या कागदपत्रांची सफाई, दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर ही कागदपत्रे डिजिटाइज करण्यात येतील. या हस्तलिखितांचे पुस्तक रूपाने खंड करण्यात येणार आहेत. तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांचे भाषांतरही करण्यात येईल. अभ्यासक, संशोधकांच्या सोयीसाठी डिजिटाइज केलेली कागदपत्रे संस्थेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या कागदपत्रांतून महत्त्वाची माहिती हाती येण्यासाठी मदत होऊ शकेल,' असे त्यांनी सांगितले.

Comments
Post a Comment