An extraordinary, excellent sketch of Maharajah serfoji ll by Sainath Vasant Parulekar |
sketch of Maharajah serfoji ll by Sainath Vasant Parulekar an 34 years old sketch artist of Mumbai who runs a facebook pagehttps://www.facebook.com/sainathArt where he contributes his talent of sketching arts. we team of Maharajah Serfoji 2 memorial hall museum, sadar mahal palace Thanjavur facebook page thank him from our bottom of our heart for sketching such an beautifull, awesome sketch of our maharajah serfoji ll on our request and also for sharing the history on his valuable Page. cheers!!
|
भोसले, सरफोजी २ : (२४ सप्टेंबर १७७७-१६ मार्च १८३२). तंजावरच्या भोसले घराण्यातील एकसरफोजी भोसले कलाभिज्ञ राजा. तंजावरचा राजा तुळजाजी (कार. १७६३-८७) याने त्याला मुलगा नसल्यामुळे मरणापूर्वी भोसल्यांचे मूळ पुरुष मालोजी राजे यांचा भाऊ विठोजी,त्याच्या वंशातील एक मुलगा दत्तक घेतला (१७८५) आणि त्याचे नाव सरफोजी ठेवले. तोच पुढे दुसरा सरफोजी म्हणून प्रसिद्धीस आला. या मुलास संगोपन व शिक्षणासाठी सी. एफ. श्वार्ट्स नावाच्या एका मिशनरी गृहस्थाकडे त्याने सोपविले. सी. एफ्. श्वार्ट्सने त्यास राजपुत्रास उचित असे शिक्षण देऊन इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, लॅटिन इ. पाश्चात्त्य तसेच मराठी, तेलुगू, हिंदी, उर्दू इ. भारतीय भाषा शिकविल्या. तुळजाजीनंतर अमरसिंह नावाच्या सावत्र भावाने पालक या नात्याने सर्व सत्ता बळकावली. तेव्हा जीवाच्या भीतीने सरफोजीला मातोश्रीसह मद्रासला आश्रय घ्यावा लागला. सरफोजीचे दत्तकविधान अशास्त्र आहे आणि मीच या गादीचा रास्त व खरा वारस आहे, असे मद्रासचा गव्हर्नर सर आर्चिबॉल्ड कँबेल याला अमरसिंहाने कळविले. तेव्हा इंग्रजांनी विशेष चौकशी न करता अमरसिंहाला तंजावरच्या गादीवर बसविले आणि त्याच्याबरोबर नवीन तह केला (१० एप्रिल १७८७.) अमरसिंहाच्या कारकीदींत (१७८७-९७) श्वार्ट्स याने पुन्हा दत्तक-प्रकरण धसास लावून ईस्ट इंडिया कंपनीला असे दाखवून दिले, की सरफोजी हाच खरा वारस आहे. तेव्हा कंपनीने अमरसिंहाला पदच्युत करून सरफोजीला राज्याभिषेक केला (१७९८). त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने सरफोजीशी एक पंधरा कलमी करार केला; परंतु पुढील वर्षींच लॉर्ड वेलस्ली या गव्हर्नर जनरलने अर्काटबरोबरच तंजावर संस्थान खालसा केले. त्या वेळी सरफोजीच्या ताब्यात खासगी मालमत्ता, तंजावरचा किल्ला आणि भोवतालचा काही भाग देण्यात आला आणि सालिना साडेतीन लाख रुपये तनखा मंजूर करण्यात आला. नामधारी राजा हा किताब नाममात्र राहिला; तरी प्रत्यक्षात राज्यकारभाराची सत्ता हातात नव्हती. अशा परिस्थितीत त्याने तंजावरच्या सांस्कृतिक विकासाकडे आपले लक्ष केंद्रित केले. सरफोजी हा ग्रंथवेडा आणि कलेचा चाहता होता. श्वार्ट्सच्या मार्गदर्शनाखाली त्याने विविध भाषा आत्मसात करून इंग्रजी साहित्य आणि अद्ययावत पाश्चात्त्य ज्ञान यांचा अभ्यास केला. शिवाय आपला व्यासंग वाढविण्यासाठी त्याच्याजवळ पुरेसा पैसा आणि भरपूर वेळही होता. विद्याव्यासंग आणि लोककल्याणाची कामे करण्यात त्याने उर्वरित आयुष्य व्यतीत केले आणि इंग्रजांकडून ‘हिज हायनेस’ हा बहुमानदर्शक किताब राज्य खालसा झाले असतानाही मिळविला. दरबारातील विद्वानांच्या मदतीने त्याने तंजावरमधील सरस्वती महाल हे ग्रंथालय समृद्ध केले. विद्वानांकडून संस्कृत ग्रंथ, काव्ये, नाटके, टीका वगैरे लिहून घेतल्या तसेच प्राचीन ताम्रपट, ताडपत्रे, भूर्जपत्रे इत्यादींचा मोठा संग्रह केला. बर्नेल नावाच्या विद्वानाने सरफोजीच्या संग्रहातील ग्रंथांची बृहद्सूची तयार केली आहे. सरफोजीने सोळा भिन्न खाती पाडून प्रत्येक खात्यावर एक दमित (प्रमुख) नेमला होता. तो स्वतः कवी होता आणि भरतनाट्यम् व संगीतकला यांना त्याने उत्तेजन दिले. भारतीय वैद्यकशास्त्राच्या अभ्यासाची त्याने सोय केली. चित्रकला, शिल्पकला व संगीत यांचाही त्याला व्यासंग होता. राजमहालातील दिवाणखाना त्याने उत्कृष्ट भित्तिचित्रांनी सुशोभित केला. याशिवाय मद्रास येथील संग्रहालय आणि इतर वाड्यांमधूनही त्याने अशा प्रकारची चित्रे काढून घेतली. सेतुभवसत्रम् व पुदुकोट्टई येथे चुनाविटांचे दोन स्तंभ उभारण्यास प्रारंभ केला होता. तंजावरमध्ये त्याने छापखाना सुरु करून देवनागरी लिपीतील खिळे तयार करवून घेतले. श्वार्ट्सच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मरणार्थ त्याने पुतळा उभारला. पवनचक्की, विद्युत्यंत्र, मनुष्याचा हस्तिदंती सांगाडा, राजमहालात उघडलेली वेधशाळा अशा विविध कृतींच्या द्वारे त्याची संशोधक व मर्मज्ञ दृष्टी दिसून येते. सरफोजीने अनेक प्रकाशित ग्रंथ आणि हस्तलिखिते गोळा केली होती. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने सरफोजीची अत्यंत महत्त्वाची कामगिरी म्हणजे तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरात इ. स. १८०३ मध्ये कोरून घेतलेला भोसले घराण्याचा इतिहास हा होय. भारतात एवढा मोठा शिलालेख कुठेही नाही. पुस्तकरूपाने हा शिलालेख प्रसिद्ध झाला, तेव्हा त्याची ५० पृष्ठे भरली. याशिवाय सरफोजीने अनेक अरबी व फार्सी ऐतिहासिक ग्रंथांची भाषांतरे करवून घेतली. त्यात इब्न बतूताचे अरबी भाषेतील ग्रंथ व शाहनामा हे फार्सी काव्य इ. महत्त्वाचे ग्रंथ होत. सरफोजीने आपल्या चौतीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत तंजावर व सभोवतालच्या प्रदेशात अनेक धार्मिक आणि शिक्षणविषयक मौलिक सुधारणा केल्या. त्याने बृहदीश्वर मंदिराच्या देखभालीसाठी देणग्या दिल्या; त्याचप्रमाणे इतर धर्मांच्या लोकांनाही समान वागणूक दिली. त्याच्या मार्गदर्शनाखाली तंजावर हे विद्येचे आणि केलेचे केंद्र बनले. या त्याच्या कार्याचा उचित गौरव लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने त्याला त्या संस्थेचे सन्माननीय सभासदत्व देऊन केला (१८२८). हा दुर्मिळ मान मिळविणारा सरफोजी हा पहिला भारतीय व संस्थानिक होता. सरफोजीविषयी तत्कालीन पाश्चात्त्य प्रवाशांनी काढलेल्या प्रशंसोदगारांवरून त्याची योग्यता कळते. सरफोजीला मुक्तंबाबाई व अहिल्याबाई ह्या दोन पत्न्या होत्या. मुक्तंबाबाई अकाली मरण पावली. अहिल्याबाईपासून त्यास तीन मुली आणि एक मुलगा झाला. तोच पुढे शिवाजी म्हणून सरफोजीच्या मृत्यूनंतर तंजावरच्या गादीवर आला. https://www.facebook.com/ |
Comments
Post a Comment